Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

भाजपा पुणे जिल्हा महामंत्री पदी आकाश विलासराव कांबळे यांची फेरनिवड.

0 6 5 0 6 1

बारामती: इंदापूर  येथील भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सचिव, भाजपाचे धडाडीचे युवा नेते, मा.सरपंच परिषद अध्यक्ष, विविध सामाजिक राजकीय कार्यक्रमात आग्रही राहणारे युवा नेतृत्व उद्योजक श्री आकाश विलासराव कांबळे यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण महामंत्री पदी फेरनिवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

भारतीय जनता पार्टीने एका खेड्या गावातील तरुणाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील माझ्यातील धडपड ओळखून मला युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली हि जबाबदारी पार पाडत असताना गेल्या 2 टर्म मध्ये या पदाला साजेसे काम करण्याची संधी मला मिळाली. या कार्यकाळात कधीच पक्षाने दिलेल्या जबाबदारीतून  बाहेर पडलो नाही तदनंतर पक्षाने मला कोल्हापूर जिल्ह्याच्या युवा मोर्चा प्राभारी पदाची जबाबदारी दिली. तेथे ही मी प्रवास करून पक्ष संघटन वाढीकरिता प्रयत्न केले. असल्याचे निवडीनंतर बोलताना सांगितले, 

मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या मनातील असणारी संकल्पना म्हणजेच युवा वॉरियर्स याचा ही मी पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून काम करीत असताना समाधान होतेच. युवा वॉरियर्स यामध्ये युवकाचा मोठा मेळावा देखील बारामती या ठिकाणी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मला घेण्याचे भाग्य मिळाले. तसेच पंढरपूर पोटनिवणुक, कोल्हापूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा या ठिकाणचा निवडणूक प्रक्रियेत माझा निवासी सक्रिय सहभाग होता. विविध आंदोलने, पक्षाचे विविध उपक्रम, मन की बात सारखे अनेक विषय यांसारखे कामे करत असताना पक्षसंघटनेत कधीच कोणत्याच कामात चालढकल केली नाही आणि त्याचच फलित म्हणून पक्षाने माझ्यावरती भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामिणच्या महामंत्री पदाची जबाबदारी संघटनेने माझ्यावरती दुसऱ्यांदा सोपवली असल्याचेही त्यांनी पुढे बोलताना सांगून  या नवीन जबाबदारी मध्ये  तसूभरही कमी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा महामंत्री राजेश दादा पांडे, पुणे जिल्ह्याचे समन्वयक व दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल, भाजपा नेते प्रवीण भैय्या माने, जिल्ह्यध्यक्ष शेखर भाऊ वढणे, भाजपा नेते वासुदेव नाना काळे, भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब तात्या गावडे, यांनी फादर बॉडी मध्ये मोठी जबाबदारी देत जो विश्वास माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दाखवला त्याला नक्कीच मी पुर्ण ताकदीने न्याय देण्याचा प्रयत्न करील व संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचे काम जोमाने वाढवण्यात माझा मनापासून हातभार राहिल.

आत्ता पर्यंतच्या प्रवासात खूप हितचिंतक, मार्गदर्शक, मला भेटले. आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे ही संधी मला मिळाली असे मी समजतो तरी सर्व सहकाऱ्यांबद्दल कृज्ञता व्यक्त करतो.आपले सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू द्या अशी सदिच्छा कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे