गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
इंदापुर पोलीस गुन्हे शोध पथकाचा दमदार कारनामा जबरी चोरीच्या गुन्हयासह एकुण २२ गुन्हयांची केली उकल.

0
6
6
7
8
3
बारामती: दिनांक १०/०७/२०२५ रोजी रात्री ०१.०० वा.चे सुमारास मौजे वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे गावच्या हद्दीत वरकुटे खु रोडवरुन एक इसम बद्रीनाथ रामु राठोड वय ३० वर्ष रा. भगवान बाबानगर रुई ता. बारामती जि.पुणे यांने दोन कामगारांना अज्ञात दोन इसमांसह मारहाण करुन त्यांचेकडून त्याचा मोबाईल, मोटारसायकल, ट्रकची बॅटरी व रोख रक्क्म २,०००/-रुपये असा एकुण २८,०००/- रुपयाचा मुदद्देमाल चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून व दमदाटी करुन घेवुन गेल्याबाबतची इंदापुर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होती.
या दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत हा गुन्हा करणाऱ्या दोन आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली कारवाईत त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे खंडु उर्फ राहुल अशोक महाजन वय १९ वर्षे व एक विधीसंघर्षीत बालक असे दोघेजण रा. वडापुरी ता. इंदापुर असे सांगितले,
तपासा दरम्यान पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली, दरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.यामध्ये त्यांचेकडून गुन्हयाचा २८,०००/- रुपयाचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी खंडु उर्फ राहुल अशोक महाजन व विधीसंघर्षीत बालक यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तसेच त्यांचे साथीदार सचिन अरुण कांबळे रा.वरकुटे खुर्द ता इंदापुर, साहिल विलास चौधरी रा उरुळीकांचन ता हवेली, रोहित दत्तात्रय कटाळे रा.उरुळीकांचन ता हवेली यांच्यासह आम्ही मागील २ वर्षांपासुन केलेल्या शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या पाण्याच्या मोटारी व शेळया बोकडे तसेच विहीरीवरील चोरीस गेलेल्या सोलर प्लेटा हे देखील चोरी केल्याची कबुली दिली.
या आरोपींनी चौकशीदरम्यान एकुण २१ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी इंदापुरच्या आजुबाजुच्या परिसरातुन शेतकऱ्यांच्या विहीरीवरील पाण्याच्या मोटारी चोरी केल्याचे एकुण १३ गुन्हे तसेच मोटार चालवण्यासाठी लागणाऱ्या सोलरच्या प्लेटा चोरीचे एकुण ०३ गुन्हे आणि शेतकऱ्यांच्या घरासमोरुन जोडधंदा म्हणुन पाळलेल्या शेळया व बोकडे चोरीचे एकुण ०५ गुन्हे असे गुन्हे उघडकिस आले आहेत.
यामध्ये ३३५००/- रुपयेचा पाण्याचे मोटारीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा.संदिप गिल, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग श्री. गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डॉ. सुदर्शन राठोड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, गुन्हे शोध पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.जीवन मोहिते, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, तुषार चव्हाण, सुरज गुंजाळ, विनोद लोखंडे, नंदु जाधव,योगेश कर्चे, दिनेश चोरमले यांनी केली आहे.
सदर प्रकरणात प्राणीछळ प्रतिबंध तसेच प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे दाखल गुन्ह्याच्या तपासात मा. पोलीस उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या परवानगीने व लेखी आदेशान्वये भारतीय न्याय संहिता 122 कलमाद्वारे वाढ करण्यात आली आहे,हे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या आरोपींवर रोख लावण्यासाठी नवीन कायद्यात सामील करण्यात आले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जीवन मोहिते हे करीत आहेत.





