Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

जळोची येथे ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

0 6 0 7 5 1

​बारामती: बारामती शहरातील जळोची हद्दीत मार्केट यार्ड परिसरामागे एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी ३ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.
​याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मौजे जळोची (ता. बारामती) गावच्या हद्दीत मार्केट यार्ड रोडवरील हॉटेल ‘जय मल्हार’च्या पाठीमागे ही घटना घडली. भानुदास हिंगणे व शंकर गोरे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला एका ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी पुरुषाने टॉवेलच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
​पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तरी सदर इसमाबद्दल कोणालाही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

​मयताची ओळखखालील प्रमाणे आहे (वर्णन)
​वय: अंदाजे ३० ते ३५ वर्षे
​लिंग: पुरुष
​चेहरा: केस काळे-पांढरे, दाढी पूर्ण वाढलेली (काळी-पांढरी).
​पेहराव: अंगात फिकट निळ्या रंगाचा लायनिंगचा शर्ट आणि काळी पॅन्ट (त्यावर पांढऱ्या रंगाचे लायनिंग).

​माहितीसाठी संपर्क:

सदर वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणास काही माहिती असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

​मा. पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी: 8108222068

​पोलीस उपनिरीक्षक (PSI) सतीश राऊत: 9405203701

​पोलीस हवालदार कांबळे (ब.नं. २३७५): 8850309820

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे