ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाची पुणे ग्रामीण व बारामती तालुका कार्यकारिणीची निवड.

0
7
9
2
3
2
बारामती: राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय खासदार मा.ना. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदसमाट बंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या तथा डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या बारामती तालुक्यातील शहर व तालुक्याची कार्यकारणी नुकतीच मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख श्री.मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य श्री.रामहरी राऊत साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन जबाबदारी देण्यात आली.यावेळी श्री.मंगेश दत्तात्रय खताळ,जिल्हा प्रमुख (ग्रामीण) तसेच सौ.शशिकला काळे,पुणे जिल्हा प्रमुख आणि सौ.सुनिता डोंबाळे,उपजिल्हा प्रमुख (महिला पदाधिकारी) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

याचबरोबर श्री.हनुमंत देवकाते(पाटील),विधानसभा प्रमुख श्री.सुशीलकुमार अडागळे विधानसभा क्षेत्र,उपसमन्वयक सौ.गौरीताई कदम,तालुका प्रमुख श्री.अनिल कदम,तालुका प्रमुख आणि सौ.गौरी भोसले,शहर प्रमुख श्री.कृष्णमुर्ती जगताप,शहर प्रमुख म्हणून यांचीही नियुक्ती करण्यात आली.

तसेच सौ.राजश्री दिंडे,उपसमन्वयक श्री.संतोष गोलांडे,उपसमन्वयक श्री.सचिन मदने,उपसमन्वयक
कु.प्रविण माकर,उपसमन्वयक श्री.विश्वास पवार पुरंदर हवेली,तालुकाप्रमुख म्हणून यांनाही जबाबदारी देण्यात आली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्या संदर्भातील मदत तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी तसेच गंभीर व महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे या करीता पंतप्रधान वैद्यकीय सहय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक गणपती मंदीर ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी बारामती तालुका कार्यकारिणी सदैव तत्पर असेल असे श्री मंगेश दत्तात्रय खताळ जिल्हा प्रमुख ग्रामीण यांनी या वेळी सांगितले.

नुकताच कोल्हापूर येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय रुग्णसेवकांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षाचे विविध खात्यांचे मंत्री तसेच आमदार यांच्या हस्ते बारामती तालुका कार्यकारणीचा गौरव करण्यात आला होता.




