अपघातअभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
रुई बाबीर तालुका इंदापूर येथे भरणार जनता दरबार
३१ जानेवारी २०२५ पासून जनता दरबाराचे आयोजन- श्री.आकाश कांबळे,भाजपा पुणे जिल्हा महामंत्री यांची माहिती.

0
6
5
0
2
3
बारामती: रुई गावातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्याच ठिकाणी निपटारा करण्याकरीता आठवड्याच्या दर शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ पासून जनता दरबाराचे आयोजन व शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी दिली.

नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, आरोग्य विषयक अडीअडचणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, व इतर सर्व शासकीय आणि निमशासकीय योजना मोफत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे कांबळे यांनी सांगीतले.

यावेळी आबासाहेब थोरात, तानाजीराव मारकड, प्रवीणकुमार शहा, दिपक साळुंखे, अविनाश मोहिते व इतर सर्व पदाधिकारी रुई येथील आकाश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून जनता दरबाराच्या माध्यमातून गाव पातळीवरील विविध समस्या व नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच ठिकाणी त्यावरती उपाय काढण्यासाठी तसेच विविध योजनांचा लोकांसाठी कशा पद्धतीने लाभ मिळवून देता येईल यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचेही श्री.आकाश कांबळे यांनी सांगितले.

तरी पंचक्रोशीतील व इंदापूर तालुक्यात नागरिकांनी दर शुक्रवारी सकाळी ९ वाजल्या पासून जनता दरबारामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.





