अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसोशल मिडिया
सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने वडगांव निंबाळकर पोलिसांच्या वतीने मार्गदर्शन

0
5
4
4
3
2
बारामती : आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे,याच गोष्टीचा विचार करतापुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने सायबर सुरक्षा जागरूकता मास ऑक्टोबर २०२५ च्या अनुषंगाने दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर प्रशालेत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी,सहायक पोलीस निरीक्षक, श्री.नागनाथ पाटील यांनी व गोपनीय विभागाचे प्रमुख श्री.विलास ओमासे यांनी भेट दिली.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य,श्री.हेमंत तांबे यांनी सहायक पोलीस निरीक्षक श्री.नागनाथ पाटील व ओमासे यांचे प्रशालेच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

श्री.पाटील यांनी प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा,सायबर गुन्हेगारी,ऑनलाईन फसवणूक, ऑनलाइन लिंक,गेमिंग ॲप्लिकेशन तसेच हेल्पलाईन क्रमांक अशा विविध प्रकारच्या विषयांवर मार्गदर्शन केले.

त्यांनी सांगितले सध्या फेसबुक व्हाट्सअप मेसेंजर या सोशल मिडीयाचा वापर करून प्रतिष्ठीत व्यक्ती/अधिकारी यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून तसेच बनावट खाते तयार करून त्याद्वारे फॅमिली मेंबर,मित्र परिवार यांना मेसेजेस (संदेश) पाठवुन त्याद्वारे अकाउंट नंबर/मोबाईल नंबर देवुन तात्काळ पैसे पाठविणेस सांगुन फसवणुक करण्याचे प्रकार घडत आहे.अशा सर्व घटनांवर दक्ष राहुन,अशा प्रकारे आलेल्या मेसेजवर खात्री केल्याशिवाय पैसे पाठवु नयेत आणि आपल्या बँक खातेविषयी कोणतीही माहिती देवू नका.
अशा फोन कॉल व मेसेजला बळी न पडता अज्ञात बँक खातेवर पैसे जमा करु नका आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते.तसेच स्क्रिन शेअरींग ॲप्सपासून सावध रहा,कारण फसवणूक करणारे तुमची गोपनीय माहिती चोरण्यासाठी त्यांचा वापर करु शकतात.कोणतीही ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करताना ते नेहमी अधिकृत संकेतस्थळावरून किंवा विश्वासू ॲप्लिकेशन्स स्टोअरच्या माध्यमातूनच डाऊनलोड करा.

सायबर गुन्हेगार आपल्याला लॉटरी लागली आहे किंवा बनावट जाहिराती बनवून संदेश पाठवून तसेच वेगवेगळ्या लिंकद्वारे फसवणूक करु शकतात. कोणत्याही लिंकवर खात्री केल्याशिवाय क्लिक करु नका. सतर्क रहा. कोणालाही आपला बँक ओटीपी शेअर करु नये, किंवा डेबिट/क्रेडीट कार्ड क्रमांक, पिन, सीव्हीव्ही, ओटीपी इ. गोपनीय माहिती कोणासही देऊ नयेत.
अनोळखी व्यक्तींकडून व्हिडिओ कॉल घेताना सावधगिरी बाळगा. तुमचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला जाऊ शकतो.
सायबर सुरक्षा जागरूकता (Cyber Security Awareness) म्हणजे सायबर धोक्यांबद्दल विद्यार्थी तसेच लोकांना शिक्षित करणे,जेणेकरून ते स्वतःचे आणि समाजातील घटकांचे संरक्षण करू शकतील.
श्री पाटील यांनी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना 1930 बँकिंग तसेच सोशल नेटवर्किंग वरील अकाउंट साठी तर 1945 हा सिम कार्ड संबंधी म्हणजेच मोबाईलवरून फसवणूक ,मोबाईल हॅकिंग संबंधी हेल्पलाइन क्रमांकाचे महत्व समजावून दिले.वरील प्रकारच्या गोष्टी घडल्यास या दोन हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करा असा सल्लाही दिला.
दरम्यान सत्र परीक्षा संपताहेत व दिपावलीची सुट्टी लागत आहे त्यानिमित्ताने दिपावलीच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शुभेच्छा दिल्या.दिपावली साजरी करताना काळजी घ्यावी तसेच सुरक्षित व सतर्क राहून सण साजरा करावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.




