अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगांव निंबाळकर येथे शालेय वर्ष २०२५-२६ चा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत

0
6
4
9
8
0
बारामती : १६ जून २०२५ शाळेचा पहिला दिवस,नुकताच मान्सून सुरु झाल्याने धरणीमातेने हिरवळीचा शालू पांघरलेल्या सुखद व आनंददायी वातावरणाची निर्मिती झाली आहे.अशाच सुखद व आनंददायी व प्रसन्न वातावरणात स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर येथील प्रशालेत शालेय वर्ष 2025/26 साठी प्रवेश व इयत्ता पाचवीच्या नविन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आनंद व उत्साहात ढोल ताशांच्या गजरात तसेच पुष्पगुच्छ देऊन प्रशालेत प्रवेश घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे ग्रामस्थांचे तसेच पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

दरम्यान इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पुस्तके वाटप करण्यात आली.तसेच एस एस सी बोर्ड परीक्षेत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये कु. अस्मिता माने,आर्यन जगताप,व कु.संकष्टी जायपत्रे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागल्यामुळे सर्व शिक्षकांच्या वतीने वर्गशिक्षक श्री.मोहन गायकवाड सर व श्री मंगेश माने सर यांचा सरपंच सुनिल ढोले व त्यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमामध्ये बारामती तालुका स्तरावर प्रशालेला तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने प्राचार्य श्री.हेमंत तांबे सर व पर्यवेक्षक श्री.बगनर सर यांचाही सत्कार करण्यात आला.
सरपंच श्री सुनील ढोले, उपसरपंच सौ संगीताताई शहा, श्री जितेंद्र पवार व प्राचार्य श्री.तांबे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिका व मोठे व्हा असा संदेश देऊन नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच श्री सुनील ढोले, उपसरपंच संगीताताई शहा, ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य संजय साळवे, अण्णासाहेब भोसले,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.कपिल शेंडे,उपाध्यक्ष संतोष गायकवाड, सदस्य रुपेश जाधव,धनश्री यादव, पांडुरंग पवार, जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष,श्री.जितेंद्र पवार, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील खोमणे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व पत्रकार श्री.सुशीलकुमार अडागळे,माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, प्रशालेचे प्राचार्य श्री. हेमंत तांबे सर, पर्यवेक्षक श्री हेमंत बगनर सर यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुस्तके वाटप करण्यात आले. एस एस सी बोर्ड परीक्षा प्रथम क्रमांक कु. अस्मिता माने 94.60% द्वितीय क्रमांक आर्यन जगताप 91.80% व तृतीय क्रमांक कु संकष्टी जायपत्रे 91% या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एस एस सी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागल्यामुळे सर्व शिक्षकांच्या वतीने वर्गशिक्षक श्री मोहन गायकवाड सर व श्री मंगेश माने सर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमामध्ये बारामती तालुका स्तरावर तृतीय क्रमांक प्रशालेला मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने प्राचार्य श्री तांबे सर व पर्यवेक्षक श्री बगनर सर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री काळे सर यांनी केले तर स्वागत व परिचय श्री.मोहन गायकवाड सर यांनी केले. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.बगनर सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.






