अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती तालुका विधीसेवा समितीवर ॲड.रणजित राजदत्त उबाळे यांची पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक

0
5
5
5
3
6
बारामतीः गरजू व पिडीतांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढणारे ॲड.रणजित राजदत्त उबाळे हे एक तरूण व प्रसिद्ध वकील आहेत.

गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे दिवंगत पंचायत समिती सदस्य व लोकनेते राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांचे ते सुपूत्र आहेत,गोरगरीबांची सेवा करण्याचे बाळकडू आपल्या परिवाराकडूनच मिळालेले आहे व हे व्रत मी पुढे असेच चालु ठेवणार असे रणजित उबाळे यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना सांगितले.

बारामती तालुका विद्यीज्ञ समितीवरील मिळालेल्या जबाबदारीमुळे जनता न्यायालयाव्दारे (लोकअदालत) खटले निकाली काढून पिडीत व्यक्तींना जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवूण देणे, लोकांमध्ये कायदेशीर जागृकता निर्माण करणे, पात्र व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत व सल्ला देणे, असे या जबाबदारीचा समाजहितासाठी उपयोग करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्या वतीने रणजित उबाळे यांची निवड करण्यात आली असून हि समिती एकूण २१ वकीलांची आहे.





