गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
मारहाण करून गुप्तांग कापले, मृतदेह पुरला, मात्र सातारा पोलिसांनी चार दिवसात आरोपी शोधला, स्थानिक गुन्हे शाखा,सातारा पोलिसांचे दमदार यश
फलटण ठाकुरकी येथील युवकाचा खून करून त्याचे गुप्तांग कापून त्याचा मृतदेह पुरून ठेवलेल्या खूनाचा अगदी शिताफीने उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

0
5
5
5
3
6
फलटण : येथील ठाकुरकी ता.फलटण येथे संदीप मनोहर रिटे या युवकाचा खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याचे आढळून आले होते त्याच्या डोक्यास व गळ्यावर गंभीर जखमा करून तसेच त्याचे गुप्तांग अर्धवट कापलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळाला होता. या घटनेने फलटण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती हा खून कोणत्या कारणातून झाला किंवा कोणी केला या बाबत तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु
“पुलिस के हाथ लंबें होते हैं” या उक्तीप्रमाणे सातारा स्थानिक गुन्हे शाखेने याचा अगदी हुशारीने तपास करीत आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा येथे अज्ञात व्यक्तिने संदीप मनोहर रिटे (रा. ठाकुरकी, ता. फलटण जि. सातारा) याला गंभीर मारहाण करुन त्याचे गुप्तांग कापून त्याचा खून केल्याची घटना घडली होती फलटण शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सातारा पथकाने फलटण येथे गुन्हयाच्या घटनास्थळास भेट देवून तेथील परिस्थितीची माहिती घेवून तपास केला असता फलटण शहरातील मच्छी मार्केट येथे दिनांक १०/०६/२०२५ रोजी सायंकाळी मयत संदीप रिटे व अज्ञात व्यक्तीचा मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्या अज्ञात व्यक्तीने मयत संदीप याचा मोबाईल काढून घेवून तो तेथून निघुन गेला होता. त्याच्या पाठोपाठ मयत संदीप रिटे हा देखील गेला असल्याची खात्रीलायक बातमी गुन्हे पथकास मिळाली, पथकाने त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले.

संशयित आरोपीकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या चुलतभावाच्या सांगण्यावरून, साडेपाच लाख रूपयांची सुपारी ठरवून संदीप रिटे याला जीवे मारल्यावर पैसे देण्याच्या अटीवर गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
याप्रकरणी मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने (वय २१ वर्षे, रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) व सोमनाथ माणीक मदने (वय ३२ वर्षे रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी ता. फलटण जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी





