Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिकसोशल मिडिया

वडगाव निंबाळकर येथे भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप 

0 5 9 3 3 9

बारामती : “अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला” “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या”

अशा जयघोषामध्ये वडगांवकरांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला, वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास ८५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांना निरा नदीवर तसेच आपापल्या परिसरात पारंपारिक आरती पूजनानंतर निरोप देत विसर्जन करण्यात आले.

वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेले दहा दिवस चाललेले पूजा पाठ, धार्मिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक देखावे सादर केले गेले,काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डॉल्बीला फाटा देत पारंपारिक वाद्यांवर भर दिला. तर काही ठिकाणी डीजेच्या आवाजांची जुगलबंदी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला व अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाली.

अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी व मुख्य दिवशी  वडगांव निंबाळकर पोलीसांवर मिरवणुकीवर पडणारा ताण त्यामुळे पोलिसांची ससेहोलट पहायला मिळाली तरीही वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक,दोन पोलीस उपनिरीक्षक, यांच्यासह 25 कर्मचारी आणि 15 होमगार्ड यांच्या सहकार्याने वडगांव निंबाळकर पोलिसांनी योग्य पद्धतीने नियोजन करून मिरवणुका कोणत्याही अनुचित प्रकारा शिवाय पार पाडल्या.

पोलिसांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मिरवणुकांवर लक्ष ठेवले जात होते. कोठेही दोन मंडळांच्या मिरवणुकीत आंतर पडेल याची काळजी घेण्यात आली तसेच ध्वनीवर्धक यंत्रणांवर लक्ष ठेवून त्याचे मापन करण्यासाठी पोलीस पथकांकडे डेसिबल मीटर यंत्रणा सज्ज होत्या. मात्र या मिरवणुकीमध्ये बहुतांश मंडळांनी डिजे तसेच पारंपारिक वाद्यांनाच पसंती दिली होती.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्याची माहिती पोलीसांकडून दिली आहे.

 

दरम्यान अनंत चतुर्थीच्या सकाळीच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील गणपतीचे विसर्जन करण्यात आले,

वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे व करंजेपूल दुरक्षेत्र  पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पांढरा नेहरु व पायजमा असा पारंपरिक वेशभूषा परिधान करत गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला,

पांढरे कपडे शांततेचे प्रतिक म्हणून ओळखले जाते या वेशभूषेमुळे वडगांवकरांचे लक्ष वेधले.

वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मिरवणूक भक्तीमय वातावरणात पार पडली.

4/5 - (1 vote)

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे