अभिव्यक्तीक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात; ५० हजार भाविकांची उपस्थिती

0
6
7
6
9
3
बारामती: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त (तुकाराम बीज) बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे ६७ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आणि बीज उत्सवाचे अत्यंत भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतून ५० हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला.

देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने आयोजित या सप्ताहात शैला महाराज यादव व बाळासाहेब नाळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ-मृदंगाच्या गजरात भव्य गाथा पारायण संपन्न झाले. सप्ताहादरम्यान भागवत शिंदे, शांताबाई बोराटे, माऊली नवले, राजेंद्र कंडरे, दत्तात्रय घुले, विजय शेंडे आणि शैला यादव यांची अभ्यासपूर्ण प्रवचने झाली.

कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शरद महाराज काळे, रोहिदास महाराज शास्त्री, सुनील महाराज निवंगुणे, समाधान महाराज पगार, एकनाथ महाराज गोळेसर आणि जयंत महाराज गोसावी यांनी आपल्या रसाळ कीर्तनातून समाजप्रबोधन केले.




