आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामती तालुक्यात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु, डॉ.मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी आठवड्याभरात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण

0
6
3
5
6
1
बारामती : पावसाळा ऋतूमधील वातावरणातील बदल आणि पारेषण काळ असल्याने किटकजन्य आजारांचा धोका वाढू नये, याकरिता तालुक्यासह बारामती, माळेगाव नगरपंचायत हद्दीत आरोग्य विभागामार्फत कंटेनर सर्वेक्षण, धूरफवारणी करण्यासह माहिती पत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

तालुक्यामध्ये १२० पथकामार्फत या आठवड्यात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण केले असता त्यामध्ये ७९ घरांमध्ये डासांच्या आळ्या आढळून आल्या, या भागात आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबविली जात आहे, डेंगू सदृश्य रुग्ण आढळून आल्यास त्या भागात कटेनर सर्वेक्षण करून ग्रामपंचायत व नगरपरिषदेमार्फत त्वरीत धूरफवारणी करण्यात येत आहे तसेच घंटागाडी (कचरागाडी ) वर ध्वनीफीतद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत रुग्णांचे रक्तनमुने घेण्यात येऊन त्वरीत प्रयोगशाळेतून तपासणी करिता पाठविण्यात येत आहे.






