Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

455 लिटर गावठी हातभट्टीची दारू पकडली, सुपा पोलिसांची दमदार कामगिरी 

0 5 5 5 4 1

बारामती : सुपा मोरगाव रस्त्याने एका पिकअप चारचाकी गाडीमध्ये हातभट्टीच्या दारूची वाहतूक होत आहे. अशी माहिती सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री.मनोजकुमार नवसरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती, त्यानुसार पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी लावून नाकाबंदीमध्ये संशयित पिकअप वाहनाची पाहणी केली असता पिकअप मध्ये 35 लिटरच्या काळ्या व पांढरे रंगाच्या प्लॅस्टिकच्या 13 कॅन व त्यामध्ये 35 लिटर या प्रमाणे एकुण 455 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली,

दारूचा एक लिटरचा दर 100 रू लिटर प्रमाणे असे  2,00,000/-रु किमतीची दारु एका महेंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीमध्ये गाडी क्रमांक MH 12 UM 6016 मध्ये आढळून आला.

विना परवाना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारू वाहतुक करणारा पिकअप व चालक यांना ताब्यात घेऊन  455 लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह 2,45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती सुपा पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली आहे.

या कारवाईत शेखर श्रीरंग पवार, रा.दाणेवाडी ता.श्रीगोंदा जिल्हा.अहिल्यानगर याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. संदीप गिल,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण , श्री.गणेश बिरादार,अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, श्री.सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मनोजकुमार नवसरे यांच्यासह,पो. हवा. दत्तात्रय धुमाळ, पो. हवा. विशाल गजरे, पो. हवा. राहुल भाग्यवंत, पो.कॉ. सागर वाघमोडे. पो. कॉ. संतोष जावीर,तुषार जैनक, सचिन कोकणे,विलास वाघमारे, पो कॉ. स्वाती पंडित यांनी केली.

गुन्हाचा पुढील तपास पो.हवा श्री.विशाल गजरे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे