Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणारे दाम्पत्य अटक.

0 6 5 2 3 2

अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

राहुरी : पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर  613/2025 भारतीय दंड विधान कलम 468,471 प्रमाणे   गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

सदर गुन्ह्यातील आरोपी ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची अचानक केले बाबत श्री दीपक नामदेव साळवे ग्राम महसूल अधिकारी देवळाली प्रवारा यांनी फिर्याद दिली होती. 

सदर गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने नमूद पती-पत्नीला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली असून मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालय कडून आरोपी त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता श्री. पाटील साहेब यांनी बाजु मांडली. आरोपीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रा बाबत माहिती काढून मूळ सूत्रधार शोधून व बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व इतर कार्यालयातील जे शासकीय कर्मचारी अधिकारी सामील असतील त्यांना अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, पोकॉ. गणेश लिपणे, मपोकॉ. वृषाली कुसळकर हे करत आहेत. 

सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा.श्री.  सोमनाथ वाकचौरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर  ,श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई राजु जाधव ,पोकॉ. गणेश लिपणे , पोहेकॉ. राहुल यादव,  पोकॉ. शेषराव कुटे, मपोकॉ. वृषाली कुसळकर, मपोकॉ. अंजली गुरव नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे