गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
मोक्का गुन्ह्यात एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला वाघळवाडी ता.बारामती येथून अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ ची मोठी कारवाई

0
7
9
4
1
1
पुणे : पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ ने मोठी कारवाई करत मोक्का गुन्ह्यात मागील एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आसरा देणाऱ्या तरुणाला जेरबंद केले आहे. ही कारवाई बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील कळंबवस्ती येथे करण्यात आली.
रोहित भारत गायकवाड (वय २५, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) असे मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर त्याला आसरा दिल्याप्रकरणी ऋतिक ऊर्फ काल्या रणजित रावळकर (वय २६, रा. कळंबवस्ती, वाघळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याला देखील अटक करण्यात आली आहे.



