अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
माळेगाव बुद्रुक नगरपंचायत क्षेत्रात चहाच्या कागदी कपांवर त्वरित बंदी घाला,अन्यथा दंडात्मक कारवाई करा, – सामाजिक कार्यकर्ते संदीप आढाव यांचे निवेदन
माळेगांव बुद्रुक येथे चहाची दुकाने तसेच हॉटेल्स मध्ये कागदी कप वापरावर त्वरित बंदी आणावी व बंदी यशस्वी होण्याकरिता दंडात्मक कारवाई करण्याचे मुख्याधिकारी, माळेगाव नगरपंचायतीला निवेदन.

0
5
9
3
4
2
बारामती: कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत ठरत असलेले कागदी कप चहाची दुकाने तसेच हॉटेल्स मध्ये सर्रास वापरले जात आहेत,चहाचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा किंवा इतर कोणताही पदार्थ या मध्ये घेतल्याने त्यातील लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात,ज्यामुळे कित्येकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे.

किंबहुना आज कॅन्सर सारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करून चहाच्या कागदी कप वापरावर माळेगाव बुद्रुक मध्ये त्वरित बंदी आणावी व बंदी यशस्वी होण्याकरिता संबंधितांना जाहिर नोटीसा काढून दंडात्मक कारवाया सुरु कराव्यात अशा आशयाचे निवेदन श्री.बालाजीराव लोंढे,मुख्याधिकारी माळेगाव नगरपंचायत यांना सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री.संदिपजी आढाव यांच्या वतीने देण्यात आले आहे.

चहाचे कागदी कप वापरणारे माळेगाव बुद्रुक मधील सर्व हॉटेल व टपरीधारकांनी दंडात्मक कारवाईला सामोरे न जाता स्वताहून चहाचे कागदी कप वापरणे बंद करावे,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री.संदिप आढाव यांनी यावेळी केले आहे.





